भारतीय संघ मजबूत स्थितीत

ऍडलेड – लोकेश राहूल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या संयमी फलंदाजीमुळे भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेर 166 धावांची आघाडी मिळवली असून सात फलंदाज बाद होणे बाकी आहेत. पुजारा आणि कोहली यांच्यात झालेल्या 71 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहचला आहे. अडलेडच्या मैदानाचा चौथ्या डावातील इतिहास पाहता भारत विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीर 15 धावांच्या आघाडीसह फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सतत अपयशी ठरत असलेल्या लोकेश राहुलने खेळपट्टीवर टिकून सावध खेळ केला. त्याला मुरली विजयाने चांगली साथ दिली. या जोडीने मिळून अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर मुरली विजय 53 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.

खेळपट्टीचा अंदाज आल्यावर राहुलने आक्रमक खेळ खेळ केला. त्याने तीन चौकार आणि एक षटकार खेचत आपले मनसुबे स्पष्ट केले. परंतु, धावगती धावण्याच्या प्रयत्नात चांगली फलंदाजी करणारा लोकेश राहुल 44 धावा करून बाद झाला. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात तो कमी पडला. भारताचे दोन्ही सलामीवीर बाद झाले तेव्हा भारत 2 बाद 76 अश्‍या स्थितीत होता. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला.

विराटने संयमी खेळी करण्यावर भर दिला तर पुजारा मागील डावाप्रमाणे चांगल्या भरात होता. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनी धावसंख्येला आकार देण्यास सुरुवात केली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा त्यांनी 50 धावांची भागीदारी पूर्ण केली होता. त्यानंतर विराट जेव्हा लेग स्पिनर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला तेव्हा कोहली -पुजारा यांची 71 धावांची भागीदारी संपुष्टात आली.

विराटने त्याच्या खेळीत104 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. विराट बाद झाल्यावर उप कर्णधार अजिंक्‍य रहाणे मैदानात फलंदाजीस आला. त्याने 15 चेंडूचा सामना करताना नाबाद 1 धाव बनविली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 3 गडी गमावत 151 धावा बनविल्या होत्या आणि पहिल्या डावातील 15 धावांची आघाडी मिळून दिवसअखेर भारताच्या खात्यात 166 धावा जमा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी जोशे हेजलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी 7 बाद 191 धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाले. दुसऱ्या दिवशी चांगला खेळ करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड आपल्या कालच्या धावसंख्येत 11 धावांची भर घालून 72वर बाद झाला. त्यानंतर तळाचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 235 धावांवर आटोपला. शेवटच्या तीन फलंदाजांनी 44 धावांची भर घातली. त्यातील दोन बळी मोहंमद शमीने घेतले तर एका फलंदाजास जसप्रीत बुमराहने बाद केले.

संक्षिप्त धावफलक – 7 बाद 191 वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलिया सर्वबाद 235- ट्रेव्हिस हेड 72 (झेल- रिषभ पंत , गोल. मोहमद शमी), मिचेल स्टार्क15( झेल- पंत, गो. बुमराह), जोशे हेजलवूड 0( त्रिफळा गो. शमी), नॅथन लायन 24 नाबाद
भारत – 3बाद 151, लोकेश राहुल 44 ( झेल- पेन गो. हेजलवूड), मुरली विजय 18 ( झेल -हॅंड्‌सकोम्ब गो. स्टार्क ), विराट कोहली 34 ( झेल-फिंच, गो. लायन) दिवसअखेर 3बाद 166 धावांची आघाडी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)