भारतीय संघ मजबूत स्थितीत, तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 151

भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी : भारताकडे 166 धावांची आघाडी

एडिलेड – पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. तिसऱ्या दिवसअखेर शनिवारी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरूध्द दुसऱ्या डावात 3 बाद 151 धावा अशी मजल मारली आहे. त्यामुळे भारताकडे आता एकूण 166 धावांची आघाडी झाली आहे.

-Ads-

भारताने पहिल्या डावात 250 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी 7 बाद 191 वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलिया संघ कालच्या धावसंख्येक केवळ 44 धावाची भर टाकू शकला. ऑस्ट्रेलियाच्या संघ पहिल्या डावात 235 धावाच करू शकला. त्यामुळे पहिल्या डावात भारताला 15 धावांची आघाडी भेटली.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजीत ट्रैविस हेडने सर्वाधिक 72 धावा केल्या. भारतीय गोलंदाजीत पहिल्या डावात रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर लोकेश राहुल 44 तर मुरली विजय 18 धावा काढून बाद झाले. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराट कोहली हा 34 धावांवर बाद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा नाबाद 40 आणि अंजिक्य रहाणे हा 1 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मिचेल स्टार्क, नाथन लायन आणि जोश हेजलवुड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)