अॅडलेड – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडलेड येथे सुरू असलेल्या चार सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय गोलंदाजीच्या प्रभावी कामगिरीपुढे ऑस्ट्रेलियाने 7 बाद 191 धावा केल्या आहेत. आॅस्ट्रेलिया अजूनही 59 धावांनी पिछाडीवर आहे.
कालच्या 9 बाद 250 धावसंख्येवरून पुढे खेळताना हेजलवूडच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमी झेलबाद झाला. त्यामुळे कालच्या धावसंख्येत भारतीय फलंदाजाना एकही धावांची भर टाकता आली नाही. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर अॅरोन फिंच याला इंशात शर्माने पहिल्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर त्रिफळा उडवत शून्यावर बाद केले. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने कमालीची गोलंदाजी करत मार्कस हॅरिस (26), उस्मान ख्वाजा (28) आणि शाॅन मार्श (2) यांना माघारी धाडले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 87 अशी झाली होती. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 2 तर इंशात शर्माने 1 गडी बाद केले.
And, that's Stumps on Day 2 of the 1st Test.
Australia 191/7, trail #TeamIndia (250) by 59 runs.
Updates – https://t.co/bkvbHcROrY #AUSvIND pic.twitter.com/6rTifC6qZg
— BCCI (@BCCI) December 7, 2018
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 191 धावा झाल्या होत्या. खेळपट्टीवर ट्रव्हीस हेड नाबाद 61 तर मिचेल स्टार्क हा 8 धाावांवर खेळत होते. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित फलंदाजाना झटपट बाद करून 40-50 धावांची आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा