संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये भारताने एका बिगर सरकारी पॅलेस्टाइन संस्थेविरोधात इस्त्रायलच्या बाजूने मतदान केले. पॅलेस्टीनियन संस्थेने हमास बरोबरचे आपले संबंध उघड न केल्यामुळे त्यांना सल्लागाराचा दर्जा देण्यावर इस्त्रायलने आक्षेप घेतला होता. यावेळी भारताने संयुक्त राष्ट्रात अशा प्रकारे इस्त्रायलच्या बाजूने मतदान करण्याची ही दुर्मिळ घटना आहे.
6 जूनला इस्त्रायलने ईसीओएसओसीच्या बैठकीत पॅलेस्टीनियन एनजीओ विरोधात एल.15 हा मसुदा प्रस्ताव सादर केला होता. 28 विरुद्ध 15 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच यावेळी पाच देशांनी मतदानात भाग घेण्याचे टाळले. ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, आयर्लंड, जापान, कोरिया, युक्रेन, युके आणि अमेरिका या देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. संयुक्त राष्ट्रात साथ दिल्याबद्दल इस्त्रायलने भारताचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्रात निरीक्षकाचा दर्जा मिळवण्यासाठी दहशतवादी संघटना “शहीद’ची विनंती फेटाळून लावली आहे.
यावेळी बोलताना इस्त्राईलच्या अधिकारी माया काडोशयांनी ट्विटर द्वारे भारताचे आभार मानले असुन या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की, नुकसान करण्याचा इरादा बाळगणाऱ्या दहशतवादी संघटनांविरोधात आपण असेच एकत्र राहून लढत राहू. भारत आमच्या बाजुने समर्थपणे उभा राहिला त्यामुळे भारताचे खुप खुप आभार.
ं