AFC U-23 Championship Qualifiers 2020 : भारताला आज विजय अनिवार्य

ताश्‍कंद- भारत आणि ताजिकिस्तान यांच्यामधे आज 23 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी 5.30 वाजता महत्वपूर्ण सामना होणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवने भारतीय संघाला स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणार आहे. 23 वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाला पहिल्याच सामन्यामध्ये गतविजेत्या उझबेकिस्तानकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

एफ गटामध्ये उझबेकिस्तान, भारत आणि ताजिकिस्तान हे तीनच संघ असल्याने अंतिम सामन्यांमध्ये आपली जागा बनविण्यासाठी श्रुंखलेतील प्रत्येक सामना तितकाच महत्वाचा मनाला जात आहे. याबाबत बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक डेरिक पेरेरा यांनी सांगितले की, ताजिकिस्तानविरुद्धचा सामना भारतीय संघासाठी खूपच महत्वाचा ठरणार असून हा सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करू.

उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पत्कराव्या लागलेल्या पराभवाबाबत देखील परेरा यांनी यावेळी वक्तव्य केले. ते म्हणाले की, उझबेकिस्तानच्या संघाचा खेळ आमच्या संघापेक्षा सरस होता, आम्हाला पूर्वार्धात गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या होत्या मात्र संघाकडून त्या दवडण्यात आल्या. ते दोन गोल करण्यात आम्ही यशस्वी झालो असतो तर सामन्याचा निकाल वेगळा असता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)