सुनामीग्रस्त इंडोनेशियाच्या मदतीसाठी भारताचाही पुढाकार 

दोन विमाने आणि तीन जहाजे भरून मदत सामग्री पाठवणार 
नवी दिल्ली: सुनामीच्या आपत्तीशी झुंजणाऱ्या इंडोनेशियाच्या मदतीसाठी भारताने ऑपरेशन समुद्र मैत्री हा उपक्रम हाती घेतला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने आज ही माहिती दिली. इंडोनेशियातील आपत्ती बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यात गेल्या 1 ऑक्‍टोबर रोजी फोनवरून चर्चा झाली आहे. त्यावेळी त्यांनी आम्ही आंतरराष्ट्रीय मदत स्वीकारण्यास तयार आहोत असे सांगितल्यानंतर भारताने त्यांना ही मदत देऊ केली आहे.
त्यानुसार भारताकडून त्यांना मदत सामग्री पुरवली जाणार असून ही मदत सामग्री घेऊन जाणारी दोन विमाने आणि तीन जहाजे लवकरच त्या देशाकडे रवाना केली जात आहेत असेही या प्रवकत्याने सांगितले.यातील दोन विमाने आज मदत सामग्री घेऊन तिकडे रवाना झाली आहेत. त्यात प्रामुख्याने औषधे आणि वैद्यकीय उपकरणे तसेच अन्य मदत सामग्री आहे. एक वैद्यकीय पथकही तिकडे पाठवण्यात आले असून वादळग्रस्तांसाठी काही तंबुही त्या सामग्री बरोबर रवाना करण्यात आले आहेत. भारताची मदत घेऊन नौदलाची जहाजे 6 ऑक्‍टोबर रोजी त्या देशाला पोहचणार आहेत. गेल्या शुक्रवारी इंडोनेशियाला 7.5 रिश्‍टर स्केल तीव्रतेचा भुकंपाचा धक्का बसला होता. त्यात मोठ्या प्रमाणात जीवीत व मालमत्तेची हानी झाली आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)