भारत 10 अब्ज ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2030 पर्यंत भारत ही 10 अब्ज ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची आकांक्षा प्रत्यक्षात येणे कसे काय शक्य आहे आणि त्यासाठीचा मोदी सरकारच्या दूरदृष्टीतील दहा कलमे सांगितली होती. परंतु हे महत्वाकांक्षी उद्दीष्ट गाठायचे असेल तर पुढील चार मुद्द्यांवर कठोरपणे काम करावे लागेल असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितलेले चार मुद्दे पुढील प्रमाणे-

वर्तणुकीत बदल घडल्याखेरीज आर्थिक बदल घडून येत नाही.

कठोर मेहनत, प्रामाणिकपणा, सौजन्य, शिस्त. विश्वास, वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे गुण असून नेतृत्वाने उदाहरणातून ते दाखवून दिले पाहिजेत. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून देऊन भागणार नाही तर राजकारण, उद्योग-कॉर्पोरेट, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्वानेही स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले पाहिजेत.

सरकराने सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) निर्यातीचा वाटा वाढवण्याची गरज आहे.

देशाच्या जीडीपीमध्ये निर्यातीचा वाटा 13 टक्के आहे, जोवर हा वाटा 25 ते 30 टक्क्यांपर्यंत जात नाही तोपर्यंत जगातील कुठलाही देश जीडीपीमध्ये वेगवान आणि टिकाऊ वाढ दाखवू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज

ते म्हणाले, महाविद्यालयांमधून मोठ्या संख्येने पदवीधर बाहेर पडत असताना शिक्षणाची गुणवत्ता हे मोठे आव्हान आहे. भारतातील शिक्षणाची गुणवत्ता ही जगात अत्यंत कमी दर्जाची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

व्यवसाय करताना करावा लागणारा संघर्ष कमी व्हावा.

ते म्हणाले, व्यवसाय करण्यावर खूप बंधने आहेत आणि एंजल टॅक्स हे त्याचे नमुनेदार उदाहरण आहे. देशात नोकऱ्या निर्माण होण्याची खरोखरच गरज असेल तर ते फक्त उद्यमशीलतेतूनच होऊ शकते आणि उद्यमशील व्यक्तींना अतिशय आदर दिलाच पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)