इराणकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेकडून भारताला सूट 

नवी दिल्ली  – अमेरिकेकडून इराणवर कच्च्या तेलासंदर्भात लावण्यात आलेल्या प्रतिबंधाला अमेरिककडून सूट देण्यात येणार आहे. या संदर्भात अमेरिकेने सहमती दर्शविली आहे.

दरम्यान भारताने इराणकडून करण्यात येत असलेली तेलाची आयात एकतृतीयांशने घटवली आहे. त्यानंतरच अमेरिकेने सूट दिली आहे. याची घोषणा पुढील काही दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेने सर्व देशांवर इराणकडून तेल घेण्यास दबाव आणला आहे. मात्र काही खास देशांना इरानकडून तेल खऱेदी करण्यास अमेरिकेकडून सूट देण्यात येणार आहे. मात्र ज्या देशांना आयातीत कपात करण्याचे आश्वासन दिले, त्यांच देशांनी ही सूट मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)