भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त टपाल तिकिटाला मंत्रीमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त टपाल तिकिटाला मंजुरी देण्यात आली. “भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील धोरणात्मक भागीदाराची 20 वर्षे” या संकल्पनेवर हे टपाल तिकीट असून जून 2018 मध्ये ते जारी करण्यात आले.

या स्मृती टपाल तिकिटावर दीनदयाळ उपाध्याय आणि दक्षिण आफ्रिकेचे ऑलिव्हर रेगिनॉर्ड टेम्बो यांचे चित्र आहे. यासंदर्भात, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मे 2018 मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)