भारताने अनावश्‍यक आक्रमकता दाखवली – इम्रान खान 

भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार 

लाहोर – भारताने आज सकाळी अनावश्‍यक आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी त्याचे प्रत्युत्तर देईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी भारताला ही धमकी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालाकोट येथे हवाई दलाच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि पाकिस्तानमधील सुरक्षा दल व सैन्याचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर इम्रान खान यांनी भारताला धमकावले आहे.

“भारताने आज सकाळी हवाई मार्गे आमच्या सीमेमध्ये घुसून अवाजवी आक्रमकता दाखवली आहे. खरे पहाता भारताला असे काही करण्याची गरज नव्हती. मात्र भारताने या प्रकारे सीमेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी भारताच्या या कृतीचे प्रत्युत्तर देईल.’ असे मला पाकिस्तान सरकारच्यावतीने सांगायचे आहे, असे खान म्हणाले. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संसदेचे संयुक्त अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला, असे इम्रान खान यांनी यावेळी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)