विश्वचषकामध्ये भारताने पाकसोबत खेळावे कि नाही? विराट म्हणतो….  

File photo

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून आयसीसी एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यास विरोध होत आहे. यासंदर्भात अनेक भारतीय खेळाडूंच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर आज अखेर भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीने मौन सोडले आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही देशासोबत उभे आहोत, असे विराट कोहलीने म्हंटले आहे.

विराट कोहली म्हणाला की, आमची भूमिका स्पष्ट असून आम्ही देशासोबत उभे आहोत. आमच्या देशाला काय पाहिजे आणि बीसीसीआय कोणता निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण संघ उभा आहे. आम्ही देशासोबत आहोत. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही, याचा निर्णय सरकार घेईल, असे विराट कोहलीने सांगितले आहे.

-Ads-

दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी कसून सराव करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)