टेबल टेनिसमध्ये पहिल्यादांच पदक
जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज दहाव्या दिवशी भारतीय टेबल टेनिस पुरूष संघाने एेतिहासिक कामगिरी केली. टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताला आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसमधील पहिले पदक मिळवून दिले.
टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला दक्षिण कोरियाकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात ग्यानसेकरण साथियन, अमलराज अँथोनी आणि अचंता शरथ कमल यांचा समावेश होता.
Table Tennis: India settles for Bronze 🥉 in Men's Table tennis team event.
Congratulations to the paddlers for winning India's first medal in Table Tennis at the event 🏓🇮🇳 ( India 0-3 South Korea )#AsianGames2018 #AsianGames pic.twitter.com/UYlOlntS5k— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 28, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा