#AusvInd 2nd Test : भारतासमोर विजयासाठी 287 धावांचे लक्ष्य

पर्थ – मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डाव्यात 243 धावांवर रोखण्यात भारताला यश आले. पहिला डावातील 43 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 243 धावा मिळून दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला आता 287 धावांचे आव्हान मिळाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ताज्या वृत्तानुसार भारताच्या दुसऱ्या डावात 2 बाद 26 धावा झाल्या असून विजयासाठी अजून 261 धावांची आवश्यकता आहे. भारताचा सलामीवीर राहुल पुन्हा अपयशी ठरला आहे, तो शून्यावर बाद झाला. तर त्यानंतर आलेला चेतेश्वर पूजारा 4 धावांवर बाद झाला. सध्या खेळपट्टीवर विराट कोहली 7 आणि मुरली विजय 10 धावांवर खेळत आहे.

कालच्या 4 बाद 132 वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा संघ 243 धावांपर्यतच मजल मारू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने 6, बुमराहाने 3 आणि इशांतने 1 गडी बाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)