मोदींबाबत ट्रम्प यांची शेरेबाजी भारताने फेटाळली

अफगाणिस्तानमधील विकासकामांमध्ये भारताच्या पुढाकाराचा मुद्दा

नवी दिल्ली: अफगाणिस्तानमधील विकासकामांना भारताने केलेल्या अर्थसहाय्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली टीका आज भारताने फेटाळून लावली आहे. अफगाणिस्तानमधील अर्थसहाय्यामुळे तेथील राहणीमान सुधारते आहे. तेथील एका ग्रंथालयाला भारताने अर्थसहाय्य केल्याच्या मुद्दयावरून ट्रम्प यांनी मोदींबाबत शेरेबाजी केली होती. त्याला आज स्पष्ट शब्दात उत्तर देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेसाठी काहीही न करणाऱ्या देशांकडून युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये ग्रंथालय उभारण्यास अर्थसहाय्य देणे निरर्थक आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी, तेथील सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेनेच लक्षावधी डॉलर खर्च केले आहेत, अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली होती. भारत, रशिया, पाकिस्तान आणि अन्य शेजारी देशांनी अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेसाठी काहीही केले नसल्याची टीकाही त्यांनी केले होते. त्यावर भारताच्यावतीने होत असलेल्या अर्थसहाय्याच्या आधारे अफगाणिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्थिर होण्यास मदत होते आहे.

अफगाण प्रशासकीय संस्था आणि सार्वजनिक सेवांच्या पायाभूत सुविधांसाठी भारत अर्थसहाय्य देत आहे.छोट्या प्रकल्पांशिवाय 31 जिल्ह्यांमध्ये 116 नवीन मोठ्या प्रकल्पांची उभारणी भारताकडून होत आहे. त्यात शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, पेय जल, नवीकरणीय उर्जा, पूर नियंत्रण म्‌ जलउर्जा, क्रीडा सुविधा आदी विषयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)