इम्रान खान यांची प्रतिक्रिया भारताने फेटाळली 

नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे. दहशतवादी गटांनी केलेल्या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध नाकारणे ही पाकिस्तानची नेहमीची कार्यपद्धती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या प्रतिक्रियेचे भारताला काहीही आश्‍चर्य वाटत नाही, असे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्याचा निषेधही केलेला नाही. तसेच या हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केलेले नाही. केवळ दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टिकरण इम्रान खान यांनी दिले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आणि हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यानेकेलेल्या दाव्याकडेही इम्रान खान यांनी दुर्लक्ष केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आणि या संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर हे पाकिस्तानातच आहेत, हे सर्वजण जाणतात. पाकिस्तानने यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा पुरावा पुरेसा आहे, असेही विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानने पुलवामाच्या दोषींवर कारवाई करावी, या भारताच्या आवाहनावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया देताना भारताने गुप्तचरांकडील पुरावे उपलब्ध करावेत, अशी मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)