भारताने नाकारले पाकिस्तानचे निमंत्रण; सार्क परिषदेवर घालणार बहिष्कार

हैदराबाद: पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्या परिषदेत भारत सहभागी होणार नाही असे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर केले आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे जो पर्यंत थांबवत नाही तो पर्यंत पाकिस्तानशी चर्चा केली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. त्या म्हणाल्या की पाकिस्तानने कर्तारपुर साहिबसाठी कॉरिडॉर खुला करण्याची घोषणा केली असली तरी त्यातून दोन्ही देशामंध्ये चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता नाही.

आज कर्तारपुरसाहिबच्या कॉरिडॉर उभारणीच्या कामाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी दोन केंद्रीय मंत्री आणि पंजाबमधील कॉंग्रेसचे एक मंत्री पाकिस्तानला गेले आहेत. आणि कालच पाकिस्तानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सार्क परिषदेचे निमंत्रण दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेबाबत भारत काय निर्णय घेणार हे पहाणे औत्स्युक्‍याचे ठरले होते. आज पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज यांनी हा निर्णय जाहीर केला. त्या म्हणाल्या की पाकिस्तानचे निमंत्रण आम्हाला मिळाले आहे पण आम्ही त्याला विधायक प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे.

-Ads-

कर्तारपुरसाहिब कॉरिडॉर प्रकल्पाच्या उद्‌घाटनासाठी हरसिमरत कौर आणि हरदीपसिंग पुरी हे दोन केंद्रीय मंत्री तिकडे भारताच्यावतीने पाठवण्यात आले आहेत याचा अर्थ आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास राजी झालो आहोत असे होत नाही असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. दोन्ही देशांच्या दरम्यानची चर्चेची प्रक्रिया सन 2013 पासून प्रलंबीत आहे. त्या म्हणाल्या की गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडे भारताने कर्तारपुर साहिब कॉरिडॉर सुरू करून भारतीय शिख भाविकांना तेथे अनुमती द्यावी अशी मागणी केली जात होती. इतक्‍या प्रचंड दिरंगाईनंतर पाकिस्तानने त्याला अनुमती दिली आहे हा चांगला निर्णय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)