भारतात प्रदूषणामुळे काही वर्षांत 25 लाखावर मृत्यू

दुसऱ्या महायुद्‌धातील मृतांपेक्षा अधिक संख्या !

नवी दिल्ली, दि. 13-गेल्या काही वर्षात दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण देशात प्रदूषणामुळे 25 लाखांपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची आणि प्रदूषणामुळे विविध आजारांनी त्रस्त झालेल्या लोकांची संख्या तर यापेक्षा कितीतरी अधिक असल्याची माहिती लॅन्सेट आयोग या संशोधन संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे.

-Ads-

प्रदूषणामुळे संपूर्ण जगात होणाऱ्या मृत्यूंची संख्या तर कोटीच्या जवळपास, म्हणजे 90 लाखांहून अधिक झाली असल्याचे लॅन्सेटच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. मृतांची ही संख्या मलेरिया, एड्‌स आणि टीबी या रोगांमुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येच्या तीनपट आहे.

या बाबतीत चीन दुसऱ्या क्रमांकावर असून चीनमध्ये प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 18 लाखांपपेक्षा अधिक आहे. विकसनशील देशांतील दर सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

लॅन्सेट आयोगाच्या अहवालावर आधारित एक लेख भारतीय हवामान खात्याच्या मौसम मंजूषाच्या नवीन अंकात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. दुसऱ्या महायुद्धात (1939-45) भारतात एकूण सुमारे 16 लाख लोक मारले गेले. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत आणि पाकिस्तानातील मिळून मृतांची संख्या सुमारे 3,000 होती, तर कारगील युद्धात 527 सैनिक शहीद झाले होते. म्हणजे या सर्व युद्धातील मृत्यूंपेक्षा प्रदूषणाने झालेले मृत्यू अधिक आहेत.

एकूण पाहिले, तर प्रदूषण हा किलर फॅक्‍टर बनलेला आहे याबाबत काही दुमत नाही. हृदयविकार, दमा, श्‍वसनाचा त्रास यांचेही प्रदूषण हे कारण असल्याचे दिसून आले आहे.

मात्र लॅन्सेट आयोग, जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य काही संस्थांनी जाहीर केलेली आकडेवारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला मान्य नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यावर संशोधन करून आपली आकडेवारी लवकरच जाहीर करील असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे सल्लागार
डॉ. टी के जोशी यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)