इंधन दरवाढ कायम ; पेट्रोलचे दर ‘या’ कारणामुळे शंभरी गाठण्याची शक्यता

पेट्रोलचे दर शंभरी गाठण्याची शक्यता

तेल उत्पादक देशांचा संघटना असलेल्या अोपेकने (The Organization of the Petroleum Exporting Countries (OPEC) ) कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यास नकार दिल्याने कच्च्या तेलाची किंमत 80 डाॅलर प्रति बॅलरहून अधिक झाली आहे. तसेच अमेरिकेने घातलेल्या बंदीनंतर इराणकडून होणारा तेल पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळातदेखील या किंमती वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, त्यामुळे पेट्रोलचे दर हे शंभरी गाठू शकतात.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह इतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून इंधनदरवाढीचा भडका  सुरूच अाहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 22 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 18 पैशांनी वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 83.22 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 74.42 रुपये इतक्‍या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईतसुध्दा पेट्रोलच्या किंमतीमध्ये 22 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 19 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. या दरवाढीबरोबरच देशाची अार्थिक राजधानी मुंबईमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 90.57 तर डिझेलसाठी 79.01 रूपये मोजावे लागत आहे. तर पुणे शहरात आज प्रति लीटर पेट्रोलचा 90.41 रूपये  तर डिझेलची प्रति लीटर 77.63 रूपये असा दर आहे.

दिल्लीमध्ये 1 सप्टेंबर रोजी पेट्रोलचा दर 78.68 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 70.42 रुपये प्रति लिटर असा होता. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 4.54 रूपयांनी तर डिझेलचे दर 4.00 रूपयांनी वाढले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढ होत असून सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलच्या किंमतीतील चढउतार आणि डाॅलरच्या तुलनेत रूपयांच अवमूल्यन होत असल्याने इंधनदरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)