विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना ठरलेल्या वेळेत होणार – आयसीसी

दिल्ली – आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यास कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी दिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने न्यूझीलंड येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत पूर्ण सुरक्षा पुरवणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. ३० मी ते १४ जुलै दरम्यान या स्पर्धा होणार असून इंग्लंड मधील सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने योग्य ती सुरक्षेची काळजी घेतली जाईल हे डेव्हिड रिचर्डसन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे १६ जून रोजी भारत-पाकिस्तान सामना ठरलेल्या वेळेत होणार आहे.

न्यूझीलंड येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बांगलादेश क्रिकेट टीम थोडक्यात बचावली होती. त्यामुळे इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेसाठी आयसीसीने योग्य ती पावले उचलली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)