इंडिया ओपन बॉक्‍सिंग स्पर्धेत मेरी कोमची विजयी सुरुवात

गुवाहाटी  – नव्या वजनी गटातून खेळताना भारताची स्टार बॉक्‍सर एम. सी. मेरीकोम हिने इंडिया ओपन बॉक्‍सिंग स्पर्धेत विजयी सुरुवात करताना नेपाळच्या माला रायचा पराभव केला. तर, हरियाणाचा युवा बॉक्‍सर पवन नारवालने 69 किलो वजन गटता युवा ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता ब्रायन अरेगुई आगस्टीनचा पराभव करीत पुरुष विभागात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सहावेळची विश्वविजेती असलेल्या मेरीकोमने मालाचा सहज पराभव करताना 51 किलो वजनी गटातून 5-0 अशी धमाकेदार विजयी सलामी दिली. आगामी ऑलिम्पिकमध्ये 48 किलो वजनी गटाचा समावेश नसल्याने मेरीकोमने 51 किलोवजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मेरीकोमच्या दमदार खेळापुढे निभाव न लागल्यानंतरही मालाने सामना संपल्यानंतर हसऱ्या चेहजयाने मेरीकोमला शुभेच्छा दिल्या.

अन्य एका लढतीत माजी विश्वविजेत्या सरिता देवीने 60 किलो वजनी गटात प्रीती बेनीवालचा 5-0 असा धुव्वा उडवत सहजपणे उपांत्य फेरी गाठली. तिनेही या विजयासह आपले पदक निश्‍चित केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)