भारतासमोर विजयासाठी 269 धावांचे आव्हान

नॉटिंगहॅम: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रीत केले होते. यावेळी इंग्लंडने 49.5 षटकांत सर्वबाद 268 धावा करुन भारतासमोर विजयासाठी 269 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

इंग्लंडने आपल्या डावाची सावध सुरुवात करताना पहिल्या 5 षटकांत 26 धावा जमवल्या, मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या धावगतीला वाढवताना इंग्लंडच्या 7 च्या सरासरीने दहा षटकांत 71 धावा जमवल्या, त्यांच्या आक्रमक धोरणापुढे आठव्याच षटकांत फिरकीपटू युझवेंद्र चहलला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याच्या या षटकांतही 7 धावा वसूल करण्यात आल्या. यानंतर 11व्या षटकांत गोलंदाजीला आलेल्या कुलदीप यादवने इंग्लंडच्या जेसन रॉय (38) याला बाद करत संघाला पहिला बळी मिळवून दिला. तर लागलीच 12व्या षटकांत ज्यो रूट (3) आणि जॉनी बेअरस्ट्रो (38) यांना बाद करत इंग्लंडला लागोपाठ दोन धक्‍के दिले. एकवेळ बिनबाद 71 धावांवर असलेल्या इंग्लंडला 3 बाद 82 अशी अवस्था त्याने केली. तर शंभरी पार केलेल्या इंग्लंडच्या कर्णधार इऑन मॉर्गन (19) याला बाद करत चहालने भारताला चौथा बळी मिळवून दिला.

मात्र, त्यानंतर बेन स्टोक्‍स आणि जोस बटलर यांनी सावध पवित्रा घेत संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. यावेळी 25व्या षटकांत संघाच्या 4 बाद 134 तर 30 व्या षटकांत संघाला 158 धावांचा टप्पा गाठुन दिला. सावधपणे फलंदाजी करत जोसने आपले अर्धशतक पूर्ण केले त्याने 51 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 53 धावा करताना स्टोक्‍सच्या साथीने 19.4 षटकांत 93 धावांची बहुमोल भागीदारी नोंदवली. तर त्यानंतर सावध खेळ करणाऱ्या स्टोक्‍सही आपले अर्धशतक झळकावल्यानंतर बाद झाला. त्याने 103 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. तर लागलीच डेव्हिड विलीला बाद करत कुलदीपने इंग्लंडला सातवा धक्‍का दिला. कुलदीपने सामन्यात 6 बळी घेत इंग्लंडच्या संघाला पुरते गारद केले.

आदिल रशिद आणि मोईन अलीने शेवटच्या षटकांत केलेल्या केलेल्या प्रतिकाराने इंग्लंडला सन्मान जनक धावसंख्या गाठुन दिली. सिद्धार्थ कौलने आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. आजच्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजीची मदार ही उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल या जोडगोळीवर होती.
संक्षिप्त धावफलक -इंग्लंड 49.5 षटकांत सर्वबाद 268 (जेसन रॉय 38, जॉनी बेअरस्ट्रो 38, बेन स्टोक्‍स 50, जोस बटलर 53, युझवेंद्र चहाल 51-1, कुलदीप यादव 25-6).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)