#AusvInd 3rd T20I : भारतासमोर आॅस्ट्रेलियाचे 165 धावांचे आव्हान 

सिडनी – अखेरच्या आणि निर्णयाक टी20 सामन्यात आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डार्सी शाॅर्टच्या 33, फिंच 28, एलेक्स कैरी 27 आणि मार्कस स्टोईनिसच्या 15 चेंडूत 25 धावांच्या जोरावर भारतासमोर 165 धावांचे आव्हान उभे केले आहे.

दरम्यान आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. आॅस्ट्रेलियाने 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या. भारताकडून क्रुणाल पांड्याने 4 षटकात 36 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने एक विकेट घेतली.

तीन टी20 सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला आहे तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे आॅस्ट्रेलियाकडे 1-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करणे भारताला अनिवार्य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)