दिल्ली,उत्तराखंडसह ईशान्येकडील राज्यात येत्या दोन दिवसात जोरदार पावसाची शक्यता

संग्रहित छायाचित्र

दिल्ली – दिल्ली आणि हरियाणासह सर्व उत्तर आणि पूर्वोत्तर राज्यात येत्या दोन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान विभागाव्दारे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार ईशान्यकडील राज्य अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिजोरम आणि त्रिपूरा तसेच उत्तरेकडील राज्य उत्तराखंडच्या काही भागात रविवारी मूसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

याशिवाय अासाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या उप हिमालय क्षेत्रात, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पूर्व राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा आणि छत्तीसगड मध्ये काही भागात येत्या 24 तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने उत्तराखंडच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि नागालँड, मणिपूर, मिजोरम, त्रिपूरा, बिहार, उत्तरप्रदेश, हरियाणा ,चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पूर्व राजस्थानमधील काही भागात सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दिल्ली आणि आसपासच्या भागात आज शनिवारी सकाळी जोरदार पाऊस पडला. सर्वाधिक 22 सेमी पाऊस जयपूर येथे झाला. झांसीमध्ये 14 सेमी, सिल्चर आणि पारादीपमध्ये 9 सेमी, दतियामध्ये 8 सेमी आणि दिल्ली , ग्वालियरमध्ये 6 सेमी पावसाची नोंद केली गेली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)