पाकिस्तानला दहशतवाद आवरता येत नसेल तर भारत मदत करण्यास तयार : राजनाथ सिंह

जयपूर: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पाकिस्तानला दहशतवादाविरोधात मदतीचा हात देण्यास तयारी दर्शवत पाकिस्तानला चांगलेच बुचकळ्यात पडले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज जयपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राजनाथ सिंह पाकिस्तानबाबत बोलताना म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याने या बाबत पाकिस्तानशी चर्चा करण्याचा प्रश्नच उदभवत नाही मात्र दहशतवादाशी संबंधित गोष्टींवर पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते.”

“मला पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना एक प्रश्न विचारायचा आहे, जर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांशी लढताना अमेरिकेची मदत घेतली जाऊ शकते तर पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तान सरकार भारताकडून देखील मदत घेऊ शकते.” असे वक्तव्य करत राजनाथ सिंह यांनी भारत दहशतवादाविरोधात पाकिस्तानला मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.

आता भारतीय गृहमंत्र्यांनी पुढे केलेल्या मदतीच्या हाताला पाकिस्तान सरकारकडून कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)