24 रोमिओ हेलिकॉप्टर्सची अमेरिकेकडे मागणी
वॉशिंग्टन – भारताने अमेरिकेकडे एमएच-60 रोमिओ हेलिकॉप्टर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही हेलिकॉप्टर्स बहुउपयोगी आहेत तथापी ती पाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर म्हणून ओळखली जातात. गेल्या दशक भरापासून ही हेलिकॉप्टर्स मिळावीत म्हणून भारत प्रयत्नशील आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी अलिकडेच सिंगापुर मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या चर्चा केली.
भारताने या आधीच अमेरिकेला एक अधिकृत पत्र पाठवून या हेलिकॉप्टर खरेदीत इच्छा व्यक्त केली आहे.अशा प्रकारची 24 हेलिकॉप्टर्स भारताने मागवली असून त्यासाठी दोन अब्ज डॉलर्स खर्च करण्याची तयारीही भारताने दर्शवली आहे. येत्या काहीं महिन्यातच या करारावर अधिकृत स्वाक्षऱ्या होतील अशी अपेक्षा आहे. भारतीय नौदलासाठी ही हेलिकॉप्टर्स आवश्यक आहेत. भारताला आणखीही अशा हेलिकॉप्टर्सची गरज असून अशा प्रकारची 123 हेलिकॉप्टर्स भारतात तयार करण्याचा इरादा आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा