भारत साकारतोय जगातील सर्वात मोठे ‘क्रिकेट मैदान’

भारतामध्ये लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा क्रिकेटचा चाहता आहे. त्यामुळे भारतात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे हे वेगळे सांगायला नको. हीच लोकप्रियता पाहता भारतामध्ये गुजरातमधील अहमदाबाद शहरातील मोटेरा येथे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान साकारण्यात येत आहे.

भारतातील हे 52 वे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान असणार असून या मैदानाला सरदार पटेल यांच नाव देण्यात आलं आहे. पुढील दोन वर्षात हे मैदान तयार होईल असं सांगण्यात येत आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाचे डिझाईन करणारी एम.एस. पोपॅल्यूस ही कंपनी या मैदानाच्या उभारणीवर काम करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर मैदान हे मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानापेक्षाही मोठे असणार आहे. मैदानाची आसन क्षमता ही 1 लाख 10 हजाराच्या घरात असणार आहे. एकूण 63 एकर जमिनीवर या मैदानाचं बांधकाम सुरू असून अंदाजे 700 कोटींचा खर्च होणार आहे.

या मैदानात सुसज्ज ड्रेसिंग रूम, स्विमींग पूल आणि अत्याधुनिक सोयी-सुविधासह 76 काॅर्पोरेट बाॅक्सेस असणार आहे. या मैदानाच्या बांधकामत कोणत्याही प्रकारच्या काॅलमची उभारणी केली जाणार नाही, त्यामुळे प्रेक्षकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.

सुमारे 3 हजार चारचाकी वाहने आणि 10 हजार दुचाकी वाहने लावता येतील एवढे मोठे पार्किंगसुध्दा या ठिकाणी असणार आहे. भारताने 2011 सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद भूषविले होते त्यानंतर आता 2023 सालच्या यजमानपदाच्या तयारीचे दृष्टीने या मैदानाचे काम चालू आहे.

गुजरात क्रिकेटचे उपाध्यक्ष परिमल नथवानी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या मैदानाच्या बांधकामाचे फोटो शेअर केले आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जात असून हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यास संपूर्ण भारतासाठी हे अभिमानस्पद असणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)