भारताने पाकिस्तानच्या उप-उच्चायुक्तांना तातडीने बोलावले

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून आज भारतावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याला भारतातर्फे चोख प्रतिउत्तर देण्यात आले. आज सकाळी भारतीय वायूसीमेमध्ये प्रवेश करणारे पाकिस्तानचे लढाऊ विमान PAF F-१६ हे भारतीय वायुदलातर्फे जम्मू येथील राजोरी भागामध्ये पाडण्यात आले आहे. भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाडण्याच्या कारवाईदरम्यान भारताचे मिग २१ हे विमान बेपत्ता झाले असून या विमानाचा वैमानिक देखील बेपत्ता आहे. हा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे उप-उच्चायुक्त सैयद हैदर शाहा यांना तातडीने बोलावले. आणि पुलवामा हल्ल्यापासून ते वायूसेनेच्या बेपत्ता वैमानिकापर्यंत सर्व मुद्दे त्यांच्यासमोर मांडले. तसेच सैयद हैदर शाहांना परराष्ट्र मंत्रालयाने समन्स दिला आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय वायुसेनेच्या कारवाईत सुमारे ३०० दहशतवादी मारले गेले आहेत. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने ही कारवाई केली.  यामध्ये जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाले. तसेच बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद लॉन्च पॅड पूर्णपणे नष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)