तो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान

इस्लामाबाद: पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हरर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. तथापी तो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृत रित्या कळवलेला नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानी पंतप्रधांनांचे वाणिज्य विषयक सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की भारताकडून आम्हाला अधिकृतपणे जेव्हा हा निर्णय कळवला जाईल त्यावेळी आम्ही त्यावर आपली भूमिका स्पष्ट करू.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य आहेत त्यामुळे आम्ही हा विषय त्या संघटनेच्या व्यासपीठावर उपस्थित करू असे ते म्हणाले. भारताने 1996 साली पाकिस्तानला मोस्ट फेव्हरर्ड नेशन हा दर्जा दिला होता पण पाकिस्तानने भारताला मात्र तसा दर्जा दिलेला नाही. पाकिस्तानकडून भारताला गेल्या वर्षभरात एकूण 3482 कोटी रूपयांचा माल निर्यात केला गेला होता. आता भारताने पाकिस्तानचा हा दर्जा काढून घेतल्यामुळे ते आता पाकिस्तानी आयात मालावर मोठ्या प्रमाणात कर लागू करू शकतात. त्याचा पाकिस्तानच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)