भारत करणार “सबांग’ बंदर विकसित 

चीनला प्रत्युत्तर ः दक्षिण-पूर्व आशियाच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचणे होणार शक्‍य

नवी दिल्ली – पूर्व क्षेत्रात स्वतःचे प्रभुत्व वाढवू पाहत असलेल्या चीनला रोखण्यासाठी भारताने मार्ग शोधला आहे. चीनचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने भारत इंडोनेशियासोबत मिळून बंदर विकासाचे काम करत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) प्रकल्पाला प्रत्युत्तर देता येणार आहे. बीआरआयच्या बळावरच चीनने हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्वतःचा प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

भारत इंडोनेशियासोबत मिळून तेथील सबांग बंदर विकसित करत आहे. या बंदरामुळे भारताला प्रामुख्याने दोन लाभ होणार आहेत. दक्षिण-पूर्व आशियाच्या बाजारपेठेपर्यंत भारताला बंदरामुळे पोहोचता येणार आहे. तसेच सामरिक स्तरावर भारताला नवे बळ प्राप्त होणार आहे. चीन या क्षेत्रात मलाक्काच्या सामुद्रधूनीच्या माध्यमातून शिरका करत असल्याने भारताचा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे.

पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारच्या काळापासूनच या क्षेत्राला व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. आसियान देशांशी असलेल्या संबंधांना देखील विशेष महत्त्व देण्यात येत आहे. पण हिंद-प्रशांत क्षेत्रात चीन कब्जाफच्या व्यूहनीतीने काम करत आहे. चीनचे आक्रमक धोरण पाहता मोदी सरकारने लुक ईस्ट धोरणात बदल करत त्याला ऍक्‍ट ईस्टफचे स्वरुप दिले आहे.

भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये विविध मुद्यांवरून तणाव आहे. याच कारणामुळे चीनला प्रत्युत्तर देणे आवश्‍यक असले तरीही ते सोपे निश्‍चितच नाही. आसियान क्षेत्रात चीन सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. 2008 मध्ये आसियानमधील त्याची एकूण गुंतवणूक 192 कोटी डॉलर्स इतकी होती, जी 2018 मध्ये वाढून 515 कोटी डॉलर्स झाली आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून चीन या क्षेत्रातील अमेरिकेचा प्रभाव कमी करण्याची इच्छा बाळगून आहे.

चीनच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत हुशारीने पावले टाकली आहेत. मे 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱयावेळी तेथील सरकारसोबत अनेक करार झाले होते. हिंद-प्रशांत क्षेत्रात भारताला सागरी सहकार्य करण्याची इंडोनेशियाने तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात भारताची युद्धनौका आयएनएस सुमित्रा इंडोनेशियाच्या दौऱयावर गेली होती. चालू महिन्यात भारतीय तटरक्षक दलाची नौका आयएनएस विजित 4 दिवसांसाठी सबांग बंदराच्या दौऱयावर गेली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)