भारताला होते अवॅक्‍स सिस्टीमचे रक्षा कवच 

नवी दिल्ली – भारताने मंगळवारी सकाळी केलेल्या एअर स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही पलटवारसाठी भारतीय वायुदल सज्ज होते. भारताने मिराज 2000 जेट पाकिस्तानात घुसवून बॉम्बहल्ला केला. या हल्ल्‌याच्यावेळी वायुदलाने अवॅक्‍स (एडब्लुएसीएस) सिस्टीम रक्षा कवच तयार करण्यात आले होते. अवॅक्‍स म्हणजेच एअरबॉर्न वॉर्निंग ऍण्ड कंट्रोल सिस्टीम. या सिस्टीमला हवाई हल्ल्याच्या वेळी विमानात फिट करण्यात येते. ही सिस्टीम शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते आणि वेळीच शत्रूंच्या हालचालींचे अलर्टही देते.

भारताकडे इस्रायली आणि इण्डिजनस अवॅक्‍स सिस्टीम आहे. भारताची अवॅक्‍स सिस्टीम ही डीआरडीओने तयार केलेली आहे. एअर डिफेन्ससाठी अवॅक्‍सचा वापर केला जातो. ही एक लॉंग रेंज रडार सर्विलन्स सिस्टीम असते. सर्वात आधी अमेरिकेने या सिस्टीमचा वापर केला होता. ही सिस्टीम फार कमी उंचीवरून उडणाऱ्या एअरक्राफ्टचाही शोध घेऊ शकते.
तसेच ही सिस्टीम किमान 370 किमी दूरपर्यंत शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकते. तर, कोणत्याही हवामानात ही सिस्टीम काम करू शकते. या सिस्टीममध्ये लावण्यात आलेला कम्प्युटर शत्रूंच्या कारवाई आणि हालचाली रेकॉर्ड करू शकतो. अवॅक्‍स सिस्टीमला शत्रूही पकडू शकत नाहीत. ही सिस्टीम जॅम करणेही जवळपास अशक्‍य असल्याने पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्याला भारत परतवून लावू शकत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)