भारत जगातील सहावी अर्थव्यवस्था

राष्ट्रीय उत्पन्न वाढून पोहोचले 2.59 लाख कोटी डॉलरवर

सहाव्या क्रमांकावरील फ्रान्स फेकला गेला सातव्या क्रमांकावर

फ्रान्सचे दरडोई उत्पन्न मात्र भारतापेक्षा 20 पटींनी जास्त

पॅरिस: भारत आता जागतिक पातळीवर सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. सहाव्या क्रमांकावरील फ्रान्स आता सातव्या क्रमांकावर गेला आहे. जागतिक बॅंकेने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था आता 2.597 लाख कोटी डॉलरची झाली आहे. तर फ्रान्सची अर्थव्यवस्था 2.582 लाख कोटी डॉलरची झाली आहे.
जुलै 2017 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पिछाडीवर होती. कारण त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीचा नकारात्मक परिणाम झाला होता. मात्र, त्यानंतर आता भारतातील विविध क्षेत्रातील उत्पादकता वाढू लागली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडत असल्याचे या अहवालात नमून करण्यात आले आहे.

भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जरी मोठे असले तरी लोकसंख्याही प्रचंड असल्यामुळे दरडोई उत्पन्न मात्र फारच कमी आहे. भारताची लोकसंख्या आता 1.34 अब्ज इतकी झाली आहे. मात्र, फ्रान्सची लोकसंख्या केवळ 6 कोटी 70 लाख आहे. म्हणजे भारताचे दरडोई उत्पन्न फ्रान्सच्या तब्बल 20 पट कमी आहे. गेल्या वर्षापासून भारताची मॅन्युफॅक्‍चरींग क्षेत्राची आणि ग्राहक वस्तू क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. भारताची अर्थव्यवस्था केवळ एका दशकात दुप्पटीने वाढली आहे. त्यामुळे भारत आता आशियायी अर्थव्यवस्थेला चांगलाच आधार ठरू लागला आहे. कारण चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंद होऊ लागला आहे.

जागतिक नाणेनिधीने जाहीर केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारताचा विकासदर 7.4 टक्‍के राहणार आहे. तर पुढील वर्षी तो 7.8 टक्‍के होणार आहे. तर याच काळात जागतिक विकासदर 3.9 टक्‍के राहणार आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्थापैकी एक असणार आहे. या क्षेत्रात भारत चीनला चांगला स्पर्धक होता. मात्र आता चीनचा विकासदर भारताच्या विकासदरापेक्षा कमी होणार आहे. कारण चीनची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी विकसित झाली आहे.
आता भारत लवकरच पाचच्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनला मागे टाकणार आहे. ब्रिटनचे राष्ट्रीय उत्पन्न सध्या भारतापेक्षा थोडे जास्त म्हणजे 2.622 लाख कोटी डॉलर इतके आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जपान तर चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे. जपान आणि जर्मनीच्या राष्ट्रीय उत्पन्नात आणि भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात जास्त फरक नाही. आता भारताने 2025 पर्यंत अर्थव्यवस्थ दुप्पट करून पाच लाख डॉलरची करण्याचे ठरविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
3 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
4 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)