भारताने घुसखोरी करणारे पाकचे एफ १६ विमान पाडले

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसले आहे. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला यश आले आहे.

विमान कोसळत असताना पॅराशूट देखील दिसले. मात्र, विमानातील पाकिस्तानी वैमानिकाविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेले नाही. या कारवाईद्वारे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.भारतीय वायुदलाने सर्व लढाऊ विमानांना अलर्ट जारी केला आहे. २ मिनिटात उड्डान भरता येईल अशा प्रकारचा अलर्ट पायलटला जारी करण्यात आला आहे. असा प्रकारचे अलर्ट आतापर्यंत फक्त युद्धाच्या वेळी दिले जात होते. शिवाय बॉर्डर जवळच्या सर्व रुग्णालयांमधील औषधांचा स्टॉक वाढवला. सर्व रुग्णालयांना अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1100644290647261185

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)