पाकिस्तानमधून आलेले मालवाहू विमान भारतीय हवाई दलाने खाली उतरवलं

जयपूर: भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधून आलेले मालवाहू विमान खाली उतरवलं आहे. ‘Antonov AN-12’ हे कार्गो विमान पाकिस्तानहून येत होतं. पण भारतील हवाई दलाने विमानाला घेरलं आणि जयपूर एअरपोर्टवर उतरवलं आहे.

हवाई दलाकडून वैमानिकाची कसून चौकशी करण्यात येत असून यावर अजून भारतीय हवाई दलाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पाकिस्तानहून आलेलं हे मालवाहू विमान भारतील हद्दीत कशे आले, याची चौकशी आता हवाई दलाकडून करण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हे जॉर्जियाचं कार्गो विमान आहे. जे त्याचा मार्गे चुकला होता. ज्यानंतर हवाई दलाने विमानाला घेरलं आणि जयपूर एअरपोर्टवर उतरवलं. हे विमान पाकिस्तान एअरस्पेसवरून गुजरातकडे येत होतं.  त्याचवेळी भारतील हवाई दलाने विमानाला विमानाला घेरलं.

https://twitter.com/ani_digital/status/1126837446577094656

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)