तिसरा कसोटी सामना: पहिला दिवस भारताच्या नावे, विराटाचे शतक हुकले

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील तिसर्या कसोटी सामन्याला काल दि. १८ ऑगस्ट पासून सुरुवात झाली. नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

खेळाला सुरुवात झाल्यापासून भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ करत खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करण्यावर भर दिला. परंतु, उपाहाराच्या अगोदर पुजारा बाद झाल्याने भारतीय संघाची ३ बाद ८२ अशी अवस्था झाली. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी भारताचा डाव सांभाळला. दोघांनी १५९ धावांची भागीदारी केली.

विराट कोहली ९७ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर रहाणे देखील बाद झाला त्याने ८१ धावांची खेळी केली.  दिवसाचा खेळ संपण्यास तीन षटके बाकी असताना हार्दीक पांड्या  १८ धावांवर बाद झाला, त्यानंतर खेळ थांबवण्यात आला.  पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची धावसंख्या ६ बाद ३०७ अशी झाली होती. कसोटी पदार्पण करणारा रिषभ पंत २२ धावांवर खेळात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)