भारताचा जपानवर दणदणीत विजय

इपोह (मलेशिया) – सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेची दिमाखदार सुरुवात करत भारताने शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जपानला 2-0 ने नमवले. विशेष म्हणजे भारतीय संघाने हा सामना मुख्य प्रशिक्षक आणि अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळला होता. यावेळी भारतीय संघातर्फे वरुण कुमारने दुसऱ्या सत्रात 24 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरानंतर जपानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाने त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी केले. त्यानंतरच्या पुढील खेळात सिमरनजीत सिंहने जपानी गोलकिपर योशिकावाला चकवत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र जपानच्या संघाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. पहिल्याच सामन्यात आशियाई खेळाचे विजेतेपद पटकावणाऱ्या जपानला चित केल्यामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढणार आहे. भारताचा पुढील सामना दक्षिण कोरिया विरुद्ध होणार आहे.

https://twitter.com/TheHockeyIndia/status/1109390253188538369

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)