भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करु शकतो – ट्रम्प

वॉशिंग्टन – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून हा तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. मात्र, सध्याची परिस्थीती पहाता भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करु शकतो, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा हल्ल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प एका कार्यक्रमात बोलत होते. भारत-पाकिस्तानमध्ये सध्या खूपच नाजूक व खतरनाक परिस्थिती आहे. भारतानं या हल्ल्यात जवळपास 40 जवान गमावले आहेत. त्यामुळे भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो. दोन्ही देशांमधील तणाव निवळावा असा अमेरिकेचा प्रयत्न आहे. आमची चर्चा सुरू आहे. चर्चा प्रक्रियेत अनेकांचा सहभाग आहे. चर्चेत समतोल साधण्याचे सध्या आव्हान आहे,’ असे ट्रम्प यावेळी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानला दरवर्षी 1.3 बिलियन डॉलर (सुमारे 93 अब्ज रुपये) इतकेआर्थिक सहाय्य अमेरिकेकडून या पुर्वी केले जायचे. या मदतीचा पाकिस्तान गैरफायदा उचलत होते. आम्हाला अपेक्षित कृती पाकिस्तान करत नसल्यामुळे आमच्या सरकारने त्यांना पुरवली जाणारी ही मदत बंद करून टाकली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)