ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा आशियातील भारत हा एकमेव संघ

सिडनी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकताना सोमवारी इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारताला 72 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे. 1947 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका खेळली होती.

मात्र, एकदाही भारताला कसोटी मालिका विजय मिळवता आला नव्हता. पण कोहलीने ही प्रतिक्षा संपवत भारतीय संघाला पहिला विजय मिळवून दिला असून या विजयासह ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा आशिया खंडातील भारत हा एकमेव संघ देखिल ठरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आशियाई देशांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 31 दौरे केले आणि त्यात 29 कर्णधारांनी आपापल्या संघाचे नेतृत्व केले. आणि एकूण 98 सामने खेळले आणि त्यापैकी केवळ 11 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला होता. परंतु, त्यापैकी एकाही देशाला कसोटी मालिका जिंकता आली नाही. कोहलीने हा पराक्रम करून दाखवला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा कोहली पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)