आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय पुरूष हाॅकी संघाचा पाकिस्तानवर विजय

हाॅकीमध्ये भारतीय संघास कांस्यपदक

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. आज आशियाई स्पर्धेत बाॅक्सिंग आणि ब्रिजमध्ये सुवर्णपदक तर स्क्वॅशमध्ये रौप्यपदक पटकाविल्यानंतर आता हाॅकीमध्ये भारतीय पुरूष संघाने कांस्यपदक पटकाविले आहे.

आज आशियाई स्पर्धेत हाॅकीमध्ये पुरूष गटात कांस्यपदकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा 2-1 असा पराभव केला आहे. या विजयाबरोबर भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले आहे.  भारताकडून हरमनप्रीत आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला.

भारताच्या खात्यात आतापर्यत 69 पदक जमा झाले आहेत. यामध्ये 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्यपदकाचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)