द्विपक्षीय महिला हॉकी स्पर्धा : भारताचा कोरियावर 2-1 ने विजय

जिंचेऊन – येथे होत असलेल्या द्विपक्षिय महिला हॉकी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने कोरियाचा 2-1 अशा फरकाने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यावेळी झालेल्या सामन्यात भारतीय संघाची नवोदीत स्ट्राईकर लालरेमसियामीने 20 व्या मिनिटाला पहिला गोल करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती.

यानंतर 40 व्या मिनिटाला पुन्हा एकदा भारताच्या नवनीत कौरने गोल करत ही आघाडी 2-0 अशी वाढवली. मात्र, त्यानंतरच्या आठच मिनिटांनी कोरियाच्या शिन ह्येजेऊंगने गोल करत कोरियाचे खाते उघडत त्यांची पिछाडी 1 गोलाने कमी करत सामन्यात 2-1 अशी गोल संख्या केली. मात्र, त्यांना दुसरा गोल करता न आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

यावेळी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्याच मिनिटापासुन वर्चस्व गाजवायला सुरूवात केली. यावेळी सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत भारतीय महिलांनी कोरियाच्या गोल पोस्टवर अनेक हल्ले चढवले. मात्र, त्यांना गोल करण्यात सातत्याने अपयश येत असताना संघाला मिळालेली पेनल्टी कॉर्नरची संधी महिलांनी गमावल्याने पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नव्हता.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या पाचव्याच मिनिटाला भारताची आघाडीची स्ट्राईकर लालरेमसियामीने आक्रमक खेळकरत कोरियाच्या संघातील बचाव फळीला भेदत कोरियाच्या गोल पोस्टवर हल्ला चढवत भारतीय संघाला पहिला गोल करुन दिला. त्या गोलने भारताने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाना पुन्हा गोल नोंदवता न आल्याने भारतीय संघाकडेच आघाडी कायम राहिली होती.

मात्र, तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या नवनीत कौरने धडाकेबाज खेळी करत संघासाठी दुसऱ्या गोलची नोंद केली. यावेळी कोरियाच्या संघाला तब्बल पाच पेनल्टी स्ट्रोक्‍सच्या संधी मिळाल्या होत्या. मात्र त्यांच्या संघाला केवळ एकाच स्ट्रोकचे रुपांतर गोल मध्ये करता आले. त्यामुळे कोरियाने 48व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. यावेळी भारताची अनुभवी गोलरक्षक सविताने उत्तम बचाव करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)