भारत आणि ब्रिटन नौदलातला संयुक्त सराव गोव्यात सुरु

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंडच्या नौदलांचा संयुक्त सराव कालपासून गोव्याच्या किनाऱ्यावर सुरु झाला. कोकण-2018 या नावाने सुरु झालेला हा सराव 6 डिसेंबर 2018 पर्यंत चालणार आहे. यात दोन्ही देशांच्या नौदल तुकड्यांनी सहभाग घेतला आहे. इंग्लंडच्या रॉयल नेव्हीचे प्रतिनिधीत्व एच एम एस ड्रॅगन ही विनाशकारी युद्ध नौका करणार आहे तर भारतीय नौदलाचे प्रतिनिधीत्व आय एन एस कोलकाता करत आहे.

आय एन एस कोलकाता ही भारताची अत्याधुनिक विनाशिका युद्धनौका असून त्यात आय एन एस पाणबुडी ही अंतर्भूत आहे त्याशिवाय समुद्रावर गस्त घालणारे नौदलाचे विमान आय एन एस डॉर्नियर या युद्ध सरावात सहभागी झाले आहे.

-Ads-

या युद्ध सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या नौदलांचे तंत्रज्ञान आणि अनुभवांचा परस्परांना लाभ मिळवून देणे हा आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रदीर्घ राजकीय संबंधांवर हा संयुक्त सराव आधारलेला आहे. या सरावात समुद्र आणि बंदरांवर वेळोवेळी नौदल क्षमता तपासल्या जाऊ शकतात तसेच युद्ध कौशल्य आणि सागरी कारवाई, पाणबुडी वापरण्याचे तंत्रज्ञान याची परस्परांना देवघेव होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)