‘असे’ झाल्यास भारत आणि जम्मू-काश्मीरचे संबंध कायमचे तुटतील : मेहबूबा मुफ्ती

संग्रहित छायाचित्र.....

जम्मू-काश्मीर : पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मिरातील आर्टिकल 370 हटवले जाण्याची भीती व्यक्त करत आहेत. याबाबत त्यांनी अनेक वेळा आपली भूमीका जाहिरपणे मांडली असून आर्टिकल 370 हटविण्यात येवू नये अशी त्यांची भूमीका आहे.

दरम्यान, आर्टिकल 370 बाबत मेहबूबा मुफ्ती यांनी आज पून्हा एकदा आपली भूमीका मांडली असून आज याबाबत बोलताना त्यांनी गंभीर वक्तव्य केलं आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दीले असून, मेहबुबा मुफ्ती यांनी आर्टिकल 370 बाबत बोलताना, “भारताने आर्टिकल 370 हटवू नये, परंतु असे घडल्यास भारताला जम्मु-काश्मिरी लोकांसोबत पुन्हा एकदा भारतासोबत राहण्यासाठी वाटाघाटी कराव्या लागतील मात्र मुस्लीम बहूल असलेला काश्मीर पुन्हा भारतात येईल का? जर भारताने आर्टिकल 370 रद्दबाद ठरविण्याचे पाऊल उचलले तर भारताचे आणि जम्मू-काश्मीरचे संबंध कायमचे तुटतील.” असं वक्तव्य केलं.

https://twitter.com/ANI/status/1111930747206684673

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)