भारत आणि इंग्लंड विजेतेपदाची दावेदार – हर्षल गिब्स

दक्षिण आफ्रिकाचा माजी खेळाडू आणि एकदिवसीय सामन्यात एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकण्याचा विक्रम नावे असणाऱ्या हर्षल गिब्सने सांगितले की भारत आणि इंग्लंड हे आगामी विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असून ते उपान्त्य फेरीत नक्कीच स्थान निश्‍चित करतील; परंतू अन्य 2 संघ कोण असतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गिब्स म्हणाला, अश्‍याप्रकारच्या स्पर्धांमध्ये कोणता एखादा संघ जिंकेल असे सांगणे कठीण असते; परंतू भारत आणि इंग्लंड हे संघ विजेतेपदाची दावेदार आहेत. इंग्लंडमधील वातावरणाचा देखील या विश्वचषकावर मोठा परिणाम होईल. त्यामुळे ज्या संघाची गोलंदाजी चांगली होईल ते उपान्त्यफेरीत स्थान मिळवू शकतात. दक्षिण आफ्रिका संघाविषयी बोलताना तो म्हणाला, एबी डिव्हीलियर्सच्या अनुपस्थितीत संघाची मदार फाफ डू प्लेसिस आणि कॅन्टम डी कॉक यांच्यावर असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात अष्टपैलु खेळाडू नसणे त्यांच्यासाठी तोट्याचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)