#NZAvINDA : भारत ‘अ’ चा न्यूझीलंड ‘अ’ वर सहज विजय

भारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ अनधिकृत एकदिवसीय मालिका : विजय शंकरची नाबाद 87 धावांची खेळी

माउंट मँगानुई – विजय शंकर आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारत अ संघाने शुक्रवारी न्यूझीलंड अ संघाविरूध्दच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात 4 गडी राखून विजय संपादित केला. या विजयासह भारत अ संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

-Ads-

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड अ संघाने 6 बाद 308 धावा करत भारतीय अ संघासमोर 309 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने एक षटक राखून 311 धावा करत न्यूझीलंडवर विजय मिळवला.

भारत अ संघाकडून श्रेयसने 54 चेंडूत 5 चौकारासह 54 धावा, तर विजय शंकरने 80 चेंडूमध्ये 12 चौकार व 1 षटकारासह नाबाद 87 धावाची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दोघांशिवाय इशान किशनने 47, मनीष पांडेने 42 आणि सलामीवीर शुभमान गिलने 37 धावाचे योगदान दिले,

भारतीय गोलंदाजीत सिध्दार्थ कौलने 2 तर खलील अहमद, नवदीप सैनी आणि कृष्णापा गौतम यांनी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड अ – 50 षटकांत 6 बाद 308 ( फलंदाजी – हमिश रूदरफोर्ड 70, टीम सिफेट 59, जेम्स निशॅम नाबाद 79) भारतीय गोलंदाजी (सिध्दार्थ कौल 2-74, कृष्णापा गौतम 1-46)

भारत अ ( विजयी संघ ) – 49 षटकांत 6 बाद 311 ( फलंदाजी – विजय शंकर नाबाद 87, श्रेयस अय्यर 54, ईशान किशन 47 ( न्यूझीलंड गोलंदाजी – हॅमिश बेनेट 2-65, लाॅकी फर्ग्युसन 2-75)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)