भारत-अ वि. न्यूझीलंड-अ : चार दिवसीय कसोटी लढत अनिर्णित 

हॅमिल्टन : भारत अ वि. न्यूझीलंड अ यांच्यातील दुसरी अनौपचारिक कसोटी लढत ही अनिर्णत राहिली. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यातील अधिक वेळ वाया गेला. भारत अ संघाने पहिल्या डावात चौथ्या आणि शेवटच्या दिवशी खेळ थांबला तेव्हा 2 बाद 159 धावा केल्या होत्या, याबरोबरच हा सामना अनिर्णित ठरला.

भारत अ संघाकडून रविकुमार समर्थने सर्वाधिक व नाबाद 50 धावा केल्या. अभिमन्यु ईश्वरनने 47 तर मयांक अग्रवालने 42 धावा करत महत्वाची भूमिका निभावली.तर गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज याने सर्वाधिक चार गडी बाद केले.

भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 303 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. न्यूझीलंड अ संघाकडून विल यंग याने 123 धावा करत महत्वाचे योगदान दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)