पहिल्या दिवशी भारत अ संघाची दमदार सुरुवात ; पहिल्या डावांत 4 बाद 322 धावा 

दुसरा अनधिकृत कसोटी सामना : पहिल्या डावांत 4 बाद 322 धावा 

बंगळुरू:  भारत अ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज सुरू झालेल्या दुसऱ्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा भारत अ संघाच्या 90 षटकांत 4 बाद 322 धावा झाल्या असून हा पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा हनुमा विहारीहा 138 धावांवर तर श्रीकर भारतहा 30 धावांवर खेळत होते. 

-Ads-

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाची सुरूवात खराब झाली. पहिल्या सामन्यातील द्विशतकवीर मयंक अग्रवाला पहिल्याच षटकांतील्प चौथ्या चेंडूवर एकही धाव न करता परतला. त्यामुळे पहिल्याच षटकात भारताची 1 बाद 1 अशी अवस्था झाली होती. तर पहिल्या सामन्यातील शतकवीर पृथ्वी शॉ देखिल केवळ 16 धावा करुन परतल्याने भारताची 7.1 षटकांत 2 बाद 18 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीयांनी सावधपणे फलंदाजी करताना संघाचा धावफलक हालता ठेवण्याचे काम केले. यावेळी संघाच्या 80 धावा झाल्या असताना अय्यरला 39 धावांवर बाद करत मुत्थुसामीने भारताला तिसरा झटका दिला. अय्यर आणि विहारीने 15.3 षटकांत 62 धावांची बहुमोल भागीदारी केली. 

यानंतर अंकित बावने आणु हनुमा विहारीने अफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर सावध पवित्रा घेत संघाला शतकीय वेस ओलांडून दिली. एका बाजुने विहारी सावध पवित्रा घेत फलंदाजी करत होता तर दुसऱ्या बाजुने अंकित बावणे खराब चेंडूंवर धावा घेत होता. त्यामुळे दोघांनीही लवकरच भारताला द्विशतकीय टप्पा ओलांडून दिला. यावेळी विहारीने आपले शतक पुर्ण करत संघाला 250 धावांचा टप्पा देखिल गाठुन दिला. मात्र, हि भागीदारी बऱ्यापैकी जमली आहे असे वाटत असतानाच 80 धावांवर खेळनाऱ्या बावनेला बाद करत पिडेटने अफ्रिकेला महत्वाचा बळी मिळवून दिला. बाद होण्यापुर्वी बावने आणि विहारीने 50.2 षटकांत 177 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. 

त्यानंतर विहारी आणि यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भारतने संयमी फलंदाजी करत भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. यावेळी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा भारताच्या 4 बाद 322 धावा झाल्या असून हनुमा विहारी नाबाद 138 धावांवर खेळत होता तर श्रीकर भारतहा 30 धावांवर त्याला साथ देत होता. यावेळी दोघांनी 16 षटकांत नाबाद 65 धावांची भागीदारी केली होती. तर दक्षिण अफ्रिकेकडून डुआन्ने ऑलिव्हर, डेन पिडेट, मुत्थुसामी आणि ऍन्रिच नॉर्टजे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

संक्षिप्त धावफलक – भारत अ – पहिला डाव- 90 षटकांत 4 बाद 322 (हनुमा विहारी नाबाद 138, अंकित बावणे 80, श्रेयस अय्यर 39, डुआन्ने ऑलिव्हर 54-1, डेन पिडेट 46-1) 

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)