भारत अ संघाची ‘दक्षिण अफ्रीका’ अ संघावर 165 धावांची आघाडी

बंगळुरू: दक्षिण अफ्रीका अ आणि भारत अ संघांदरम्यान सुरू असलेल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात सलामीवीर मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारत अ संघाने दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा 2 बाद 411 धावा केल्या असून दक्षिण अफ्रीका अ संघावर 165 धावांची आघाडी मिळवली आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेल सुरू झाल्यानंतर दक्षिण अफ्रीका अ संघाचे अखेरचे दोन फलंदाज एकही धाव न करता तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या भारत अ संघाच्या सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी संघाला दमदार सुरूवात करुन देताना सावध आणि आक्रमक खेळी करत दक्षिण अफ्रीकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवायला सुरूवात केली. शॉ आणि अग्रवाल यांनी पहिल्या गड्यासाठी तब्बल 277 धावांची भागीदारी करताना आपापले शतक पुर्ण करत दक्षिन अफ्रीकेच्या धावसंख्येला मागे टाकत दमदार सुरूवत करुन दिली. भारत अ संघाच्या 277 धावा झाल्या असताना डेन पिएडेटने शॉला बाद करत अफ्रीकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. यावेळी शॉने 196 चेंडूत 20 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 136 धावांची खेळी करताना अग्रवाल सोबत 58.5 षटकांत 277 धावांची भागीदारी केली.
शॉ बाद झाल्या नंतर आलेल्या रविकुमार समर्थने देखिल आश्‍वासक सुरूवात करत भारतीय संघाचा धावफलक हालता ठेवण्याचे काम केले. यावेळी दुसऱ्या बाजुने फलंदाजी करणाऱ्या मयंक अग्रवालने आपले द्विशतक साजरे करत संघाला चारशे धावांच्या जवळ पोहोचवले. संघाच्या 395 धावा झाल्या असताना समर्थला बाद करत डुआन्ने ऑलिव्हीअरने दक्षिण अफ्रीकेच्या संघाला दुसरा बळी मिळवून दिला. समर्थने 65 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 35 धावांची खेळी करताना अग्रवालच्या साथीत 24 षटकांत 118 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. समर्थ बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने सावध खेळी करताना भारतीय संघाला आणखीन धक्‍का लागू न देता सावध फलंदाजी करत दिवस अखेर संघाला 2 बाद 411 धावांची मजल मारून दिली.
दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा मयंक अग्रवाल 220 धावांवर नाबाद होता तर श्रेयस अय्यर 9 धावा करुन त्याला साथ देत होता. तत्पूर्वी, पहिल्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा दक्षिण अफ्रीका अ संघाने 8 बाद 246 धावांची मजल मारली होती. मात्र दुसऱ्या दिवशीच्या खेळात त्यांच्या फलंदाजांना एकेही धाव काढता आली नाही. त्यामुळे त्यांचा पहिला डाव केवळ 246 धावांतच अटोपला. यावेळी भारता कडून मोहम्मद सिराजने 56 धावा देत 5 गडी बाद केले. तर नवदीप सैनी आणि रजनीश गुर्बानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत त्याला सुरेख सथ दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)