निर्देशांक कोसळला ; गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान

File photo

मुंबई: भारताची अर्थव्यवस्था मजबूत असतानाही परदेशातील नकारात्मक परिस्थितीमुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक शुक्रवारी मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले. रिऍल्टी, माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांना विक्रीच्या मा-याला सामोरे जावे लागले. त्यामुळे ब्लॅक फ्रायडे ठरलेल्या शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सन्सेक्‍स 1.89 टक्‍क्‍यांनी म्हणजे 689 अंकांनी कोसळून 35742 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 197 अंकांनी कोसळून 10754 अंकावर बंद झाला. मुख्य निर्देशांकाबरोबरच मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 1.89 टक्‍क्‍यांनी, तर स्मॉल कॅप 1 टक्‍क्‍यांनी कोसळला.

भारतातील महागाई कमी आहे, भांडवल सुलभता वाढली आहे, व्यापारातील तुट कमी झाल्यामुळे रुपया बळकट झाला आहे, क्रुड घसरल्यामुळे महागाई नियंत्रणात राहणार आहे. असे असले तरी अमेरिकेतील परिस्थिती फारच बिघडण्याची शक्‍यता आहे. एक तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी व्याजदर वाढीविरोधात धमकी देवूनही फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. त्यातच अमेरिकन संसद आणि ट्रम्प यांच्यातील मतभेद वाढल्यामुळे सोमवारपासून अमेरिकेतील कर्मचा-यांना पगार न मिळण्याचे संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम जागतिक शेअर बाजाराबरोबर भारतीय शेअर बाजारवरही दिसून आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आज त्याचा फटका रुपयाला बसला असून रुपयाच्या मुल्ल्यात 52 पैशांची घट झाली आहे. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 386 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.

मुळात भारतीय अर्थव्यवस्था मजूबत आहे. त्यातच शनिवारी ब-याच वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निर्देशांक कमी असताना खरेदीसाठी ही चांगली परिस्थिती असल्याचे मत एम्के मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे संशोधन प्रमुख जोसेफ थॉमस यांनी व्यक्‍त केले.

तुफान नफेखोरी
एकतर जागतिक शेअर बाजारांना प्रदिर्घ सुटटया असल्याने नफा काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेबरोबरच जागतिक विकासदर कमी होणार असून त्यातच अमेरिका-चीनचे व्यापारयुद्ध वाढले आहे. चीन बौद्धिक संपत्तीकडे दुर्लक्ष करून तंत्रज्ञानाची चोरी करतो, असा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे आगामी काळात व्यापारयुद्ध चिघळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संस्थागत गुंतवणूकदारांबरोबरच किरकोळ गुंतवणूकदार नफा काढून घेण्याच्या मनस्थितीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)