कराड उत्तर मतदारसंघात अपक्ष लढा

आ. जयकुमार गोरे यांचा धैर्यशील कदम यांना सल्ला

रहिमतपूर – राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होत असताना जिल्ह्यातही सत्तेमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे. जिल्हा परिषद सत्ता व विधानसभेला जिल्ह्यात चार जागा मिळाल्याच पाहिजेत आणि नाही मिळाल्या तर कराड उत्तर मधून अपक्ष लढा दिला जाईल, असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला.

दुर्गळवाडी, ता. कोरेगाव येथे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा सत्कार व कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, संपतराव माने, जेष्ठ नेते शंकरराव पाटील, वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम, जि. प. सदस्य भिमराव पाटील, निवास थोरात, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, शुभांगी काकडे, हणमंतराव मोरे-पाटील, प्रविण भोसले, निलेश माने, बबन शेडगे, विकास राऊत, महेश उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आ. गोरे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या कराड उत्तरच्या विद्यमान आमदारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सगळ्या संस्था घशात घातल्या. परंतु त्यांचे विकासाचे स्वप्न पुर्ण करता आले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दीडशे कोटींच्या विकास कामामुळे कराड उत्तरची जनता कॉंग्रेसच्या पाठीमागे आहे. धैर्यशील कदम यांनी पक्षाकडे तिकीट मागावेच आणि नाही दिले तर अपक्ष लढाई करायची तयारी ठेवावी.
यावेळी कोणी मदतीला येईल, कोण प्रचाराला येईल याची अपेक्षा न ठेवता स्वत:च्या हिमतीवर व कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर निवडणूक जिंकून दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, जिल्ह्यात कॉंग्रेसची ताकद वाढत आहे. पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल. राज्यात आघाडी होताना जिल्ह्यातही राष्ट्रवादी पक्षाने आघाडी धर्म पाळावा. धैर्यशील कदम यांच्यासारखे लोकप्रतिनीधी कराड उत्तरमध्ये निवडून आले तर विकास होईल.
जि. प. सदस्य भिमराव पाटील यांचे भाषण झाले. प्रास्ताविक महिपती यादव यांनी केले. सुत्रसंचालन दिपक साबळे यांनी केले तर आभार बाबासो म्हसकर यांनी मानले.

आमदारांना काविळ

आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर टिका करताना धैर्यशील कदम म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून कराड उत्तरमध्ये दीडशे कोटींची विकासकामे केली आहेत. परंतु, विद्यमान आमदारांना काविळ झाल्यामुळे झालेली कामे दिसत नाहीत. हणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे स्वप्न स्व. यशवंतराव चव्हाण यांचे होते. परंतु, यांच्या घरात तीस वर्ष आमदारकी असूनही हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. निवडणूक लागली की यांना हणबरवाडी योजना आठवते. दशहतीतून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता एवढेच चालले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)