बुंदेलखंड आणि पुर्वांचल साठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापन

लखनौ: उत्तरप्रदेश सरकारने बुंदेलखंड आणि पुर्वांचल साठी दोन स्वतंत्र विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. या मंडळांवर दोन उपाध्यक्ष एक अध्यक्ष, दोन तज्ज्ञ आणि 12 सरकारी तसेच 11 अशासकीय सदस्य नेमले जाणार आहेत. त्यातील सदस्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत व्यापाऱ्यांसाठीही कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न या मंडळाद्वारे केला जाणार आहे. मुख्यमंत्री स्वता या मंडळाचे अध्यक्ष असतील.

कर्तव्य बजावत असताना गंभीर आजाराने कोमात गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना अपवादात्मक स्थितीत पेन्शन लागू करण्याचा महत्वाचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मद्यपरवाने वाटप धोरणही नव्याने जाहीर करण्यात आले त्यानुसार आता मद्य विक्रीचे परवाने लॉटरी पद्धतीने दिले जातील अशी माहिती उत्पादनशुल्क खात्याचे मंत्री जयप्रताप सिंह यांनी सांगितली. राज्याला दारू विक्रीतून सुमारे पंधरा हजार कोटी रूपये इतका महसुल मिळतो.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)