सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली

राष्ट्रीय निवडणूक आयोग ः मतदानाच्या 48 तास आधी काटेकोरपणे नियमांचे होणार पालन

मुंबई –
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदानाच्या 48 तास अगोदर सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या पोस्ट्‌ना आळा घालण्यासाठी लवकरच स्वतंत्र नियमावली जाहिर करणार असल्याची हमी राष्ट्रीय निवडणूक आयोग आज अखेर उच्च न्यायालयात दिली.

जाहिरातबाजी तसेच पक्षाच्या प्रचाराबाबत पोस्ट अपलोड केले जातात. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ऍड. सागर सुर्यवंशी यांच्यावतीने ऍड. अभिनव चंद्रचुड यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने ऍड. प्रदिप राजागोपाल यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या पोस्टना आळा घालण्यासाठी लवकरच स्वतंत्र नियमावली जाहिर केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच आचारसंहितेच्या काळात मतदानाच्या 48 तास आधी सर्व समाजमाध्यमांसाठी नियम अधिक काटेकोरपणे राबवले जातील. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्ते, गुगल, फेसबुक, ट्विटर, युट्यूब यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचाही विचार केला जाईल, अशी लेखी हमी दिली.

यावेळी समाजमाध्यमांनी त्याचं पालन न केल्यास काय कारवाई करणार? असा प्रश्‍न उपस्थित केला असता फेसबुक आणि गुगलच्या वतीने आम्ही केवळ खातेधारकांना एक माध्यम उपलब्ध करून देतो. त्यांचा मजकूर हा कुणापर्यंत पोहचावा, कुणापर्यंत नाही याचे संपूर्ण नियंत्रण हे खातेधारकाकडेच असते. तर कोणता मुद्दा हा देशासाठी महत्त्वाचा आहे, हे आम्ही किंवा कुणी एक व्यक्ती नाही ठरवू शकत, असा दावा करत गुगलने स्पष्ट केले की उद्या जर आगामी विश्वचषकाची जाहिरात ही देशाबाहेरून आली तर आम्ही ती स्वीकारायची नाही का? असा मुद्दा उपस्थित केला. याची दखल न्यायालयाने घेतली. या संदर्भात आम्ही योग्य ते निर्देश देऊच. मात्र राष्ट्रीय निवडणुक आयोगाने यासंदर्भात कठोर नियम आपल्या अधिकारात तयार करण्याची गरज असल्याचा पुनरूच्चार करून याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)